मेंढ्यांच्या कळपावर पडली वीज | १६ मेंढ्या ठार

बुलढाणा : जिल्ह्यात साखळी येथे विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान मेंढ्याच्या कळपावर वीज कोसळल्याने 16 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक मेंढ्या जखमी झाल्या आहेत 5 आणि 6 मार्चच्या मध्यरात्री बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील पिकाचे देखील नुकसान झाले . तर बुलढाणा शहरा नजीकच्या साखळी येथील एका शेतामध्ये वास्तव्यास असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळली . या दुर्घटनेत 16 मेंढ्या जागीच ठार झाल्यात तर 25 मेंढ्या जखमी झाल्या आहेत . या अवकाळी पावसामुळे मेंढपाळांचे सुमारे पाच लाख रुपयांचं नुकसान झाले आहे . या वादळी पाऊस वाऱ्याचा तडाखा गहू तसेच हरभरा पिकांनाही बसला आहे.