पोपटराव पवार यांची उद्या गोळवण येथे गावभेट…!

कणकवली : आदर्श गांव योजनेमध्ये गांव निवडीच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार गाव भेट व ग्रामसभेचे आयोजन ६ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल येथे सकाळी ०९.३० वा. करण्यात आले आहे.

यावेळी आदर्श गांव संकल्प आणि प्रकल्प समिती, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री. पोपटराव पवार हे उपस्थित राहणार आहेत.ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गाव ग्रामसेविका सौ. माधुरी कामतेकर यांनी केले आहे.