कुडाळ : हुमरमळा वालावल गावासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी जलमिशन योजनेतुन ५० लाखांचा निधी फेब्रुवारी महीन्यात दीला होता. ती कामे सुरुपण झाली आणि आता पुन्हा जनसुविधा व आमदार फंडातून २१ लाखांचा निधी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी दिला असल्याची माहिती हुमरमळा (वालावल) सरपंच सौ अर्चना बंगे यांनी दिली.
यावेळी बंगे म्हणाल्या खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी हुमरमळा (वालावल) गावासाठी निधी देताना मागे पुढे न पहाता जे जे विकासाचे काम मागु ते ते काम आज पर्यंत दीले आहे. म्हणुनच हुमरमळा वालावल गाव पुर्णपणे आमच्या पाठीशी राहीला असुन ग्रामस्थांच्या सतत सहकार्याने आम्ही गावचा विकास करत असल्यानेच ग्रामस्थ विकासाच्या बाजुने असल्याचेही सौ. बंगे यांनी सांगुन हुमरमळा ग्रामपंचायत सुसज्ज होण्यासाठी पहील्या टप्प्यात १६ लाख रुपयांचा निधी खासदार विनायक राऊत यांनी देऊन हुमरमळा ताईचा माठा ते रामेश्वर विद्यामंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पाच लाख रुपये निधी मंजुर केला आहे
त्याबद्दल उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांचे आभार मानतो असेही सौ. अर्चना बंगे यांनी सांगितले





