मळगाव : बॉक्सवेलकडे मॅजिक रिक्षा व चारचाकी यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातानंतर चार चाकीमधील तरुणांनी खाली उतरत मॅजिक ड्रायव्हरला ओढून बाहेर काढत आपल्या चारचाकी गाडीमध्ये नेऊन मारहाण केली.
मॅजिक चालक स्थानीक असल्याने त्याला झालेल्या मारहाणीची बातमी वाऱ्यासारखी फैलावली आणि तात्काळ त्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. या घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना मिळताचं ते आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी मारहाण करणाऱ्या तरुणांना आपला ताब्यात द्या अशी मागणी जमावाने केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आणि जमाव यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. सदर चारचाकीमधील युवक एका लोकप्रतिनिधीचे नातेवाईक असल्याची चर्चा होती. बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.





