दोडामार्ग : तळकट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दिनांक २ मार्च रोजी सकाळी १० वाजता मोफत वैद्यकीय तपासणी व औषध पुरवठा होणार आहे. या शिबिरात डॉ. राजेश गुप्ता, डॉ. नंददीप चोडणकर, डॉ विशाल पाटील, डॉ.आंबापूरकर मेंदुतज्ञ, आदी डॉक्टर सहभागी होणार आहेत.
या शिबिरात कंबरदुखी, सांधेदुखी, तसेच मधुमेह, डोळे तपासणी, हृदयरोग तसेच डॉ. योगेश चीपुळूनकर याचात आयुर्वेदिक औषध उपचार, पंचकर्म, रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातील. या शिबिरात उद्घाटनास विशेष उपस्थिती चेन्नई क्रिकेटर निखिल नाईक तर मुंबई संघाचे खेळाडू प्रथमेश गावडे उपस्थित असणार आहेत





