दिव्यांग व्यक्तीचे कागदपत्र अखेर मिळाले | कणकवली पोलिसांच्या वतीने मालकाच्या दिले ताब्यात

117

कणकवली : कणकवली – ओरोस असा प्रवास करणारे सचिन शशिकांत सावंत (बावशी) यांची महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग वागदे येथे पडली. परंतु ती बॅग पडल्याचे त्याच्या लक्ष्यात आले नाही. ती बॅग कैलास चंद्रकात घाडीगावकर यांनी पडलेली मिळाली. त्यानी ती बॅग कणकवली पोलिस ठाण्यात येऊन हजर केली. त्या बॅगेतील कागदपत्राची तपासणी केल्यानंतर ती बॅग बावशी येथील एका अपंग व्यक्तीचे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर त्यांनी बावशी पोलिस पाटील  यांच्याशी संपर्क साधुन बॅगेची खात्री करून सचिन सावंत यांच्या ताब्यात दिली.

यावेळी पोलिस स्नेहा राणे, पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ जांभळे, चंद्रकांत माने उपस्थित होते.