राजुरच्या घाटात एस. टी बसचे ब्रेक फेल | चालकाच्या प्रसंगावधानामुळे 40 प्रवासी बचावले

196

बुलढाणा : २३ फेब्रुवारीला गुरुवारी सायंकाळी बुलढाणा शहराजवळील राजुरच्या घाटात एसटी बसचे ब्रेक अचानक फेल झाले. एस टी चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत ही बस उजव्या बाजूच्या खोल दरीत जाऊ न देता डाव्या बाजूला असलेल्या डोंगरावर धडकवली. त्यामुळे बस पलटी झाली. केवळ दोघांना या अपघातात किरकोळ मार लागला असला तरी चाळीस प्रवाशांचे जीव या चालकाने वाचवले आहेत.

बुलढाणाहून जामनेरकडे चाळीस प्रवाशांना घेऊन निघालेली ही बस ऐन घाटात तिचे ब्रेक फेल झाल्याने पलटी झाली आहे. भीषण अपघात या ठिकाणी होता होता टळला आहे. ज्या ठिकाणी घाटात ही बस पलटी झाली आहे. बाजूलाच मोठी दरी आहे. या दरीत जर का ही बस जाऊन कोसळली असती तर 40 प्रवाशांना आपल्या जीवाला या अपघातात मुकावं लागलं असते. त्यामुळे एसटी महामंडळांने रस्त्यावर धावत असलेल्या जुन्या बसेसची वेळीच देखभाल दुरुस्ती करून मगच बसेस रस्त्यावर उतरवाव्या, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.