कणकवली : वैश्य समाज कणकवली तालुका यांच्यावतीने कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार सोहळा शनिवार दि. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते १ वा. पर्यंत महाराजा मंगल कार्यालय, विद्यामंदिर हायस्कूलसमोर करण्यात येणार आहे.
यावेळी (भाई) तवटे, माजी आ. राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, नगरपंचायत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, वैश्य गुरु सेवा समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दिपक अंधारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.





