उद्या सातार्डा इथं रक्तदान शिबीर…!

सावंतवाडी : गोवा – बांबोळी येथील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने त्या ठिकाणी रक्ताची आवश्यकता आहे. याबाबत बांबोळी ब्लड बँकेच्या व्यवस्थापकांनी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गशी मागणी केल्याने शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी सातार्डा-देऊळवाडी येथे जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नं.१ येथे सकाळी ९.०० ते १.०० या वेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

याबाबत बऱ्याच रक्त दात्यांशी,रक्त मित्रांशी फोनद्वारे, व्हाट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधला असता.तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान नाव नोंदणी करिता संतोष कांबळी (साटेली ) मो.9881088809 यांच्याशी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.