सावंतवाडी : सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयाचे नाव बदलून खाऊ गल्ली ठेवावं लागेल. वजनाशिवाय या कार्यालयात कोणाचीच काम होत नाहीत अशी या कार्यालयाची ओळख. परंतु त्याच्यावरती कहर म्हणून गेले ११ दिवस हे कार्यालय कर्मचाऱ्याविना सुरू असून सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, जमीनदार, नागरिकांना या कार्यालयात अकरा दिवस येरझऱ्या घालाव्या लागत आहेत असा आरोप सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केलंय.
यामुळे तालुक्यातील नागरिकांना आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे. या कार्यालयात आर्थिक मलिदा दील्याशिवाय सामान्य लोकांची कामं होत नसल्याचा आरोपही बबन साळगावकर यांनी केलाय.





