चिंतामणी नगर येथील भाजी मंडईमधे भीषण आग | सुदैवाने जीवितहानी टळली

पुणे : काल मध्यराञी दोन वाजता हडपसर, हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथील भाजी मंडईमधे भीषण आग लागली. या आगीत जवळपास ९० स्टॉल, सर्व भाजीपाला व इतर साहित्य तसेच दोन टेम्पो जळून खाक झाले.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण मिळवण्यात यश मिळाले आहे. सुदैवाने या भीषण आगीत कुणीही जखमी झाला नाही.