आई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित स्पर्धांचे नारायण राणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण…!

इंडियन आयडॉलच्या कलाकारांनी आर्केस्ट्राच्या माध्यमातून वेधले कणकवलीकरांचे लक्ष…

कणकवली : शिवजयंती उत्सवानिमित्त केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून इंडियन आयडॉल कलाकारांचा संगीतमय नजराणा असलेला आर्केस्ट्रा उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात आयोजित केला होता. यात महमंद दानिश याने मेरे रशके कमर, पंजाबी भांगडा, काला चष्मा, उंची है बिल्डिंग लिफ्ट तेरी बंद है, गुलाबी आखे जो तेरी देखी, रूप तेरा मस्ताना, मेरी जिंदगी की सवारी, मै हू डॉन, नायक नही खलनायक हू मै, हमे तो लूट लिया दिल वालोने, चांदणी की रात है, खल बली खली बली यासह अन्य हिंदी गाणी गाऊन तरुणाईला ठेका धरायला लावून त्यांना बेधुंद केले.

इंडियन आयडॉल मधील महमंद दानिश, विभोर पराशर निलंजना रे, श्रावणी महाजन या गायकांनी सदाबहार हिंदी व मराठी गाणी गाऊन रसिकांना मने जिंकली.

त्यामुळे इंडियन आयडॉल कलाकारांचा संगीतमय नजराणा असलेला आर्केस्ट्रा कणकवलीकरांसाठी यागदार ठरला. या कलाकारांनी सादर करताना सूर ताल आणि लय यांचा मिलाफ रसिकांसाठी स्टँडिंग ओवेशन सह टाळ्या देण्यास भाग पडणार ठरला. ही संगीत रंजनी पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

श्रावणी महाजन हिने चांदणी झाली रात, एकविरीची पहाट, कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षा वाला, खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली, सुपारी फुटली, यासह रोमांटिक व लावणी नृत्य गाऊन रसिकांना अशरक्षः घायाळ करून टाकले.

निलंजना रे हिने ईश्वर ही सत्य, सत्य ही ईश्वर है, सत्यम शिवस सुंदर, तेरे में बीच में कैसा हे अंतर, मेरे ढोलना यासह अन्य मराठी व हिंदी गाणे गाऊन रसिकांची वाहवा मिळवली. विभोर पराशर याने दिल से रे यासह अन्य मराठी व हिंदी गाणी सादर करून उपस्थितांना टाळ्या मिळवल्या. हिंदी व मराठी गाण्यांवर इंडियन आयडॉल इंडियन आयडॉल महामंद दानिश, विभोर पराशर, निलांजना रे, रिया धत्ते श्रावणी महाजन या गायकांनी रसिकांकडून स्टैंडिंग ओवेशन सह टाळया शिट्टा घेतानाचा त्यांना ठेका धरायला लावला. एकंदरीत रविवारची रात्र कणकवलीकरांसाठी यादगार ठरली. सेलिब्रेटीजचा लाईव्ह परफॉर्न्सस सुरु असताना रसिकांनी त्यांच्यासोबत सेल्फीदेखील काढले. ही संगीत रंजनी पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

इंडियन आयडॉल कलाकारांचा संगीतमय नजराणा असलेला आर्केस्ट्रा पाहण्यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे, त्यांना पत्नी नीलम राणे, आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित दर्शवून कलाकारांचा परफॉर्न्सस पाहिला. आर्केस्ट्रा दरम्यान शिवजयंतीनिमित्त आई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना केंद्रीयमंत्री नारायण राणे, नीलम राणे, आमदार नीतेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, माजी सभापती मनोज रावराणे, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.