कणकवली : संजय राऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात आज सायंकाळी ५ वाजता स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी लावलेले कणकवली पटवर्धन चौकामधील “इलाका तेरा धमाका मेरा” या टॅग लाईन खालचे बॅनर हे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे असल्याचे कारण देत हे बॅनर हटवण्यासाठी नगरपंचायत प्रशासन पटवर्धन चौकात दाखल झाले आहे. त्यामुळे या विषयावरून राजकीय वातावरण तापू लागले. हा बॅनर हटविण्यास शिवसैनिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे कणकवली पटवर्धन चौकातील परिस्थिती पाहता कणकवलीतील वातावरण ताईट
असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणचे वादग्रस्त बॅनर नगरपंचायत प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने हटविले आहे. त्यामुळे पटवर्धन चौकातील वातावरण हे टाईट असल्याचे पाहायला मिळतंय. दंगल नियंत्रक पथक देखील कणकवली पटवर्धन चौकात तैनात ठेवण्यात आले आहे.





