भारताचे शेजारील राष्ट्र अर्थात पाकिस्तान मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटाला तोंड देत आहे. येथे धान्य, अन्नपदार्थ, दूध यासारख्या साध्या वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. असे असतानाच सरकारचा महसूल वाढावा यासाठी पाकिस्तानने पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. येथे एक लिटर पेट्रोलसाठी २७२ पाकिस्तानी रुपये मोजावे गालणार आहेत. तर डिझेलचा दर प्रतिलिटर २८० पाकिस्तानी रुपये झाला आहे. आधीच महागाईला तोडं देत असलेल्या पाकिस्तानात इंधन दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे पाकिस्तानी जनतेच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.





