मृत कस्तुरी हिच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी केले सात्वंन
कणकवली (प्रतिनिधी)
कस्तुरी पाताडे हिच्या मृत्युप्रकरणी दोषींवर मुंबई नर्सिंग होम अॅक्टप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. कस्तुरीच्या मृत्युसारखी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आरोग्य विभाग व पालकमंत्री म्हणून मी दक्षता घेणार आहे. कस्तुरीच्या मृत्युप्रकरणी सावंतवाडीतील एक डॉक्टर खंडणी मागितल्याचा आरोप करीत आहे.
त्या डॉक्टराचा आरोप धादांत खोटा आहे. या प्रकरणी कोणीही खंडणी मागितलेली नाही. कस्तुरीच्या मृत्यू व डॉ. नागवेकर रुग्णालय तोडफोडप्रकरणी कोणाही राजकारण करू नये, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी करतानाच खंडणी मागितल्याचा आरोप करणाऱ्या डॉक्टराने माझ्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा, असा इशारा दिला आहे.
कस्तुरी पाताडे हिच्या कुटुंबीयांची पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी सायंकाळी भेट सांत्वन केले. यावेळी माजी जि. प. संजय देसाई, रवींद्र जठार, कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती दिलीप तळेकर, मनोज रावराणे, माजी उपसभापती प्रकाश पारकर, माजी सरपंच संतोष पारकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, संजय पाताडे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीरंग पाताडे, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी बंड, सहदेव खाडये, श्रीपत पाताडे, नामदेव पाताडे, वारगाव सरपंच नाना शेट्ये, दीपक सावंत, प्रणिल शेट्ये यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मंत्री नितेश राणे यांनी पाताडे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंत्री राणे म्हणाले, कस्तुरी पाताडे हिच्या मृत्युची घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेनंतर मी ग्रामस्थांच्या संपर्कात होतो. कस्तुरी हिच्या मानेवर चुकीच्या पद्धतीने नागवेकर हॉस्पिटल डॉक्टरांकडून झाल्याने तिचा मृत्यू झाला नातेवाईकांचा आरोप आहे.
याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांशी उद्धटपणे वर्तवणूक करून चप्पल फेकल्यानंतर जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. कस्तुरी हिच्या मृत्यू व रुग्णालय तोडफोड प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याबाबतीमध्ये मी स्वत: पोलीस यंत्रणेची आणि आरोग्य यंत्रणा बरोबर मी चर्चा करणार आहे.
या घटनेसारखी पुरनावृत्ती घडू नये पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न असेल. मृत्युप्रकरणी नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी डॉक्टरांकडून खंडणी मागल्याचा आरोप सावंतवाडीतील एका डॉक्टराने केला. त्यांचा हा आरोप धादांत खोटा आहे. याप्रकरणी कोणीही खंडणी मागतली नाही. पाताडे कुटुंबीयांना माणुसकीच्यादृष्टीतून मदत करा, अशी अपेक्षा कासार्डेवासीयांची होती.
याबाबत कोणीही चुकीचं वक्तव्य करून वातावरण खराब करू नये. प्रत्येक क्षेत्रामध्ये एका सडक्या विचारांचे लोक असतात. त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सडक्या विचारांचे लोक आहेत. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आचारसंहिता पाळणे हे गरजेचे आहे. कस्तुरी हिच्या मृत्युप्रकरणी मी स्वत: मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांची मी चर्चा करणार आहे.
सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्था सक्षम झाली पाहिजे. यासाठी शासनाच्या माध्यमातून मी प्रयत्नशील आहे. या वैद्यकीय क्षेत्रावरील विश्वास उगडणार नाही, याची जबाबदारी या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीनी घेतली पाहिजे. कारण या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना जनता दैव मानते.
या सगळ्या घटनेमध्ये पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यावर माझा बारकाईने लक्ष आहे. दोन्ही बाजूने झालेल्या केसेसच्या बाबतीमध्ये मी एसपी आणि तपासी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कस्तुरीच्या मृत्युनंतर भावनेचा उद्रेक झाला. उद्रेकाच्या निमित्ताने रिअॅक्शन बाहेर आली.
आरोग्य सुधारण्याबाबत मी प्रयत्नशील आहे. याबाबत लवकरच शासकीय यंत्रणेसोबत मी बैठक घेणार आहे. बैठकीतील माहिती पत्रकार परिषद घेऊन जनतेला देणार आहे. कस्तुरीच्या हिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार नागवेकर हॉस्पिटलमध्ये तिचे नेमके ऑपरेशन कोणी केले, शस्त्रक्रियेनंतर कोल्हापूरला का पाठवले गेले.
कोल्हापूरला गेल्यावर तिची प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला हा घडलेला प्रकार तिच्या वडिलांनी मला सांगितला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी मी करणार आहे. चौकशीअंती दोषींवर कडक शासन होणार आहे. कस्तुरी हित्या मृत्युकरणी राजकारण किंवा कोणाच्या बदनामी करणे, कोणाच्या विरुद्ध षडयंत्र करण्याची गोष्ट नाही.
मृत्यु व तोडफोड प्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. कायद्यानुसार दोषी सुटणार नाहीत. बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टची खासगी डॉक्टरांनी अंमलजावणी केली पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री राणे यांनी केली.





