बांदा : दुर्बल घटक असो वा कमी उत्पन्न, प्राधिकरण देते विधी सेवेची हमी. हे ब्रीदवाक्य घेऊन विधी प्राधिकरणाने तळागाळातील लोकांना कायदे विषयक ज्ञान व्हावे म्हणून मोबाईल व्हॅन द्वारे नागरिकांना कायद्याची माहिती देण्यासाठी अनेक ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
नुकतेच इन्सुली येथील विद्यालयात मोबाईल व्हॅनद्वारे विधी प्राधिकरणाच्या वतीने कायदे विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश, माननीय उपाध्ये स्वप्निल कोलगावकर, ॲड. पूजा जाधव, ॲड. परब ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक चव्हाण उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील लोकांना रोजच्या जीवनात आवश्यक असलेले कायदे व त्या कायद्यांचा आधार घेऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला कशी दाद मागावी याची सविस्तर माहिती दिली. कायदा म्हणजे काय ? आणि कायद्याचा वापर कसा करायचा ? याविषयीही मान्यवरांनी योग्य असे मार्गदर्शन केले.





