हुमरमळा श्री देव रामेश्वर मंदिरामध्ये नागेश नेमळेकर यांनी केले उत्कृष्ट निवेदन | खेळ पैठणीमध्ये सुप्रिया योगेश परब ही ठरली पैठणी साडीची मानकरी

कुडाळ : हुमरममळा (वालावल) श्री देव रामेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

मंगळवार दीवस महीलांनी खेळ पैठणीचा कार्यक्रम करुन रंगत आणली यासाठी कुडाळ मधील सुप्रसिद्ध निवेदक नागेश नेमळेकर यांनी महीलांना खळखळून हसण्याबरोबर विविध खेळ घेऊन कार्यक्रमाची रंगत आणली.

पैठणी साडी प्रथम क्रमांक पुरस्कृत सरपंच सौ अर्चना बंगे, द्वीतीय मानसी मेघनाथ वालावलकर यांनी आकर्षक भेटवस्तू व तीसऱ्या क्रमांकासाठी हेमांगी प्रकाश आजगावकर यांनी भेट वस्तू पुरस्कृत केली होती. यामध्ये खेळात सहभागी होणा-या सर्व महीलांना युवा कार्यकर्ते मितेश वालावलकर, मयुर प्रभु यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अतुल बंगे यांच्या हस्ते नागेश नेमळेकर यांचा सन्मान तर पैठणी देऊन सुप्रीया परब हीला सन्मानित केले. सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते तसेच द्वीतीय, तृतीय सौ मानसी वालावलकर हीच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.

यावेळी हौशी मित्र मंडळ हुमरमळा मितेश वालावलकर, मयुर प्रभु, योगेश गाळवणकर, निखिल वालावलकर,जयेश परब, संदेश जाधव,पुजा गाळवणकर, स्नेहल सामंत, प्रविण मार्गी,अमृत देसाई यांनी सहकार्य केले