ओम पतंजली योग समितीचा दीक्षा यज्ञ समारोह कुडाळ संपन्न

69

ओम पतंजली योग समितीचा दीक्षा यज्ञ समारोह कुडाळ संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी)

23 सप्टेंबर 2025 रोजी पतंजली योग समितीचा दीक्षा यज्ञ समारोह कुडाळ येथील रविकमल सभागृहात पार पडला.

पतंजली जिल्हा समिती सिंधुदुर्गच्या वतीने जानेवारी 2025 व मार्च 2025 मध्ये 25 दिवस घेण्यात आलेल्या सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरातील योग परीक्षेत पास झालेल्या प्रशिक्षणार्थीना आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 दिवशी दीक्षायज्ञ करून प्रमाणपत्र वितरण करण्याचा कार्यक्रम कुडाळ मध्ये भक्तिमय,उत्साही व प्रसन्न वातावरणात करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी पुण्यातून भारत स्वाभिमान महाराष्ट्र पश्चिमचे आदरणीय राज्यप्रभारी श्री बापूजी पाडळकर व कोल्हापूर मधून पतंजली योग समिती महाराष्ट्र पश्चिमचे राज्यप्रभारी आदरणीय चंद्रशेखर खापणेजी यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी आदरणीय तुळशीराम रावराणेजी हे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी श्री महेश भाट, श्री दत्तात्रय निखार्गे,श्री सर्वानंद दळवी,श्री रावजी परब,श्री रवींद्र पावसकर,श्री प्रकाश कोचरेकर हे जिल्ह्यातील सर्व नवे जुने पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते .

प्रथम दैनंदिन योगवर्ग त्यानंतर दीक्षा यज्ञ मान्यवरांचे स्वागत दीपप्रज्वलन मान्यवरांचे मनोगत व सत्कार प्रमाणपत्र वितरण असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.महिला पतंजलीच्या कुडाळ तालुका नूतन कार्यकारिणीचा यावेळी सत्कार करण्यात आला.दीक्षा यज्ञ बाबली गवंडे व बापूजी पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुडाळ योगवर्गातील डॉ परब ,योगेश गवंडे ,सिद्धेश नाईक,निशा कडावलकर,श्रेया बांदेकर ,GD सावंत ,प्रमोद नाईक ,रवी राऊळ यांनी बहुमोलाची मेहनत घेतली.

या कार्यक्रम प्रसंगी आदरणीय बापूजी यांनी हवन यज्ञ व योग प्राणायाम या विषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले.हा संपूर्ण कार्यक्रम मुख्य योग शिक्षक हरिद्वार विद्याधर पाटणकर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली पार पडला.