मुणगे भगवती मंदिरातील एकवीस दिवसाच्या गणेशोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
देवगड तालुक्यातील मुणगे येथील देवी भगवती देवस्थानच्यावतीने आयोजित केलेल्या एकवीस दिवशीय गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाना रविवार ता.७ पासुन सुरूवात झाली आहे.. एकवीस दिवसाच्या गणेशोत्सवा निमित्ताने भगवती मंदिर मध्ये विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. यामध्ये दररोज रात्री गावातील वाडीवाडीतील स्थानिक भजन मंडळांची भजने तसेच सोमवार ता.८ रोजी रात्री ९-३० वाजता भवानी रामेश्वर डंपर सर्व्हिस मनोज प्रकाश हडकर पुरस्कृत बाळा सावंत दशावतार नाट्य मंडळ नेरूर-असरोंडी यांचे पौराणिक नाटक भक्तीमहिमा ” झाले. बुधवार ता.१० रोजी रात्री ९-३० वाजता पावणादेवी समईनृत्य मंडळ किंजवडे यांचे समईनृत्य गुरूवार ता.१२ रोजी रात्री ९-३० वाजता रिक्षा चालक-मालक संघ, व्यापारी आणि मित्रमंडळ भगवती मंदिर मुणगे यांच्यावतीने दूर्गाई फुगडी मंडळ कातवण-देवगड यांचे फुकडी नृत्य, शुक्रवार ता.१२ रोजी रात्री ९-३० वा.आंबा बागायतदार पुरस्कृत माऊली वारकरी दिंडी भजन मंडळ मोर्वे-देवगड यांचे दिंडीत भजन, रविवार दि.१४ रोजी सकाळी १० वा. सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापूजा ११-३० वाजता श्रींची महाआरती १२ वाजता पासून तिर्थप्रसाद सध्याकाळी ४ वाजता पासून गावातील स्थानिक भजने संध्याकाळी ७-३० वाजता श्री भगवती देवस्थान मुणगे आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित भजनस्पर्धकांच्या सहभागातून जिल्हास्तरीय भजनस्पर्धा होणार आहेत यामध्ये. चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ सुरंगपाणी -वेंगुर्ले चे बुवा अनिकेत भगत, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी-कुडाळचे बुवा प्रसाद आमडोसकर,श्री गांगोरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोयरे-देवगडचे बुवा जयेश घाडी, श्री जैतिर प्रासादिक भजन मंडळ तुळस-वेंगुर्लेचे बुवा सिध्देश नाईक, श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ राठिवडे-मालवणचे बुवा अक्षय परुळेकर, श्री काळंबादेवी प्रासादिक भजन मंडळ कुणकेश्वर वरचीवाडी-देवगडचे बुवा अतुल मेस्त्री, आणि रामकृष्ण हरी सेवा संघ पाट पंचक्रोशी-वेंगुर्लेचे बुवा आशिष सडेकर,हे निमंत्रित बुवा जिल्हास्तरीय भजनस्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. सोमवार दि.१५ रोजी रात्री स्थानिक भजनमंडळाची भजने मंगळवार दि.१६ रोजी दुपारी १-३० वाजता श्रींच्या मुर्तीचे विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. मिरवणूक देवूळवाडी,परबवाडी, मार्गे हरिजनवाडी, सावंतवाडी, लब्देवाडी, भंडारवाडी, आडवळवाडी, आडवळवाडी समुद्रकिनारी जाणार असून संध्याकाळी ५-३० वाजता आरती व श्रींच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवी भगवती देवस्थान समिती व देवी भगवती देवस्थान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.