पोस्ट कार्यालयातील दोन मोबाईलची चोरी ; तळेबाजार येथील घटना
तालुक्यातील तळेबाजार येथील पोस्ट ऑफिसचे मागील दार उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला व तळेबाजार पोस्ट ऑफिस च्या कार्यालयीन कामकाजाचे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना तळेबाजार येथे घडली.
बुधवार सायंकाळी ५ वाजले नंतर पोस्ट ऑफिस बंद करून गुरुवारी सकाळी ८ वाजता पोस्ट ऑफिस उघडले असता पोस्ट ऑफिसचे मागील दार उघडे असल्याचे आढळून आले. त्यावेळी ,पहाणी केली असता पोस्ट ऑफिस च्या कार्यालयीन कामकाजाचे दोन मोबाईल चोरीस गेल्याचे डाक सहाय्यक यांच्या निदर्शनास आले. यात सॅमसंग व रियल मी कंपनीचे प्रत्येकी एक मोबाईल याप्रमाणे दोन मोबाईल सुमारे ६ हजार किमतीचे अज्ञात चोट्याने लंपास केल्याचे फिर्याद पोस्ट ऑफिसचे प्रभारी डाक सहाय्यक आशिष संदिपान कुसभागे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीएनएस ३०५, ३२१(३)३२१(४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहे.