देवगड (प्रतिनिधी)
कुणकेश्वर हायस्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत चमकदार कामगिरी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरस येथील क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय ‘ज्युदो स्पर्धेत’ माध्यमिक विद्यामंदिर, कुणकेश्वर या शाळेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रशालेचा लौकिक वाढविला.
या स्पर्धेत विविध गटांमध्ये एकूण १९ खेळाडूंनी पारितोषिकस्थानी मजल मारली. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
१४ वर्षाखालील मुलींचा गटामध्ये ,
32 किलो खालील गट : द्वितीय – सृष्टी गणेश लब्दे, तृतीय – ऋत्वी गुरुनाथ साटम.
40 किलो खालील गट : तृतीय – पूर्वी गुरुनाथ साटम
१७ वर्षाखालील मुलींचा गटामध्ये
36–40 किलो गट : द्वितीय – वैदेही हेमंत वातकर, तृतीय – भक्ती गणेश लब्दे
44–48 किलो गट : द्वितीय – प्रांजली उमेश नाणेरकर, तृतीय – श्रेया प्रसाद चव्हाण
48–52 किलो गट : तृतीय – सृष्टी विश्वास मुंबरकर
52–57 किलो गट : तृतीय – सुहानी महेश लब्दे





