सावंतवाडी (प्रतिनिधी)
मोती तलाव येथील मगरीला जेरबंद करण्यात सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला अखेर यश
मोती तलावात येथील मगरीला जेरबंद करण्यात सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला अखेर यश आले आहे. जलद कृती दलाच्या या सापळ्यात ही पाच फुटी मगर कैद झाली असून तब्बल पाच दिवस त्या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले होते. मोहीम यशस्वी झाल्यानंतर सावंतवाडीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सावंतवाडीच्या मोती तलावात मगर असल्यामुळे भितीच वातावरण होत. त्यात ती संगीत कारंजावर येऊन दर्शन देत होती. यामुळे ऐन गणेशोत्सवात विसर्जनस्थळी संकट निर्माण झाल होत. त्यामुळे या मगरीला पकडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गेले पाच दिवस ही मगर पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. मात्र, त्यात यश येत नव्हते. तब्बल दोन वेळा तिनं संगीत कारंजावर दर्शन देखील दिल. मात्र, आज लावलेल्या सापळ्यात जलद कृती दलाच्या मोहिमेला यश आले. यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती.





