पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले खवळे महागणपतीचे दर्शन

70
देवगड (प्रतिनिधी)

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले खवळे महागणपतीचे दर्शन

सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकासमंत्री ना. नितेश राणे यांनी देवगड तारामुंबरी येथील खवळे महागणपतीचे दर्शन घेऊन ट्रस्ट तर्फे होणाऱ्या विविध सामाजिक धार्मिक उपक्रमांचा शुभारंभ देखील केला. यावेळी पालकमंत्री राणे म्हणाले की, खवळे महागणपती ट्रस्ट विविध सामाजिक तसेच धार्मिक उपक्रम राबवते हे उपक्रम आदर्शवत आहेत ट्रस्ट तर्फे आयोजित उपक्रमांचा शुभारंभ आज मी केला आहे गेले अकरा वर्षे मी न चुकता खवळे महागणपतीचे दर्शनसाठी येतो. खवळेगणपती खवळे कुटुंबीय व आमचे संबंध हे राजकारण पलीकडचे आहेत ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवगडला येथील त्यावेळी ते नक्की भेट देते असे त्यांनी नमूद केले .या शुभारंभ प्रसंगी ना नितेश राणे यांनी पंचजोती प्रचलित केली ट्रस्टचे पदाधिकारी सूर्यकांत खवळे यांनी त्यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम भाजपा देवगड मंडळ तालुका अध्यक्ष राजा भुजबळ, दयानंद पाटील, सिद्धेश माणगावकर व सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते. खवळे महागणपती ट्रस्टच्या विविध स्पर्धांचा शुभारंभ नामदार नितेश राणे यांनी केले असल्याचे जाहीर केले. दरम्यान देवगड भेटींना नितेश राणे यांनी जामसंडे येथील ग्रामदैवत दिर्बांदेवी रामेश्वर तसेच देवगड मधील विविध घरगुती गणपतीचे दर्शन घेतले शिरगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला देखील भेट दिली.