मडुरा पंचक्रोशीत पाच दिवसांच्या गणरायाला निरोप

19
बांदा (प्रतिनिधी)

 

मडुरा पंचक्रोशीत पाच दिवसांच्या गणरायाला निरोप

मडुरा पंचक्रोशीत भाव, भक्ती आणि उत्साहात पार पडलेल्या पाच दिवसांच्या गणरायाला रविवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. सकाळपासूनच गणपती विसर्जन मिरवणुकांसाठी गावोगावी तयारी सुरू होती. भाविकांनी आरती गीतांमधून बाप्पाला निरोप दिला, तर लहान मुलांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमवले.
गणरायाच्या आगमनापासून घराघरात दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

भक्तांनी या पाच दिवसांत गणरायाचे दर्शन घेत भरभरून आशीर्वाद मिळवला. विसर्जनावेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा भावनिक हाकेत गणरायाला निरोप देण्यात आला. गावोगावच्या रस्त्यांवरून जाताना गणपती बाप्पाच्या जयघोषांनी वातावरण मंगलमय झाले होते.