कणकवली (प्रतिनिधी)
नांदगाव तिठा येथे गोवा बनावटीची दारू जप्त
नांदगाव तिठयावर ब्रिजखालील स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेली १२ हजार १०० रुपये किमतीची गोवा बनावटीची अवैध दारू एलसीबीच्या पथकाने जप्त केली. ही कारवाई रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी सुरेंद्र उर्फ पपी वायंगणकर सह अवधूत वाळके या दोघांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार रविवार रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई एलसीबी पीएसआय आर. बी. शेळके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पपी वायंगणकर हा नांदगाव तिठा येथे अवैध दारूविक्री करत असल्याची खबर एलसीबीला मिळाली होती.





