ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्ष पदी सोहन शारबिंद्रे यांची निवड

16

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्ष पदी सोहन शारबिंद्रे यांची निवड

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्ष पदी सोहन शारबिंद्रे यांची निवड करण्यात आली आहे.सोहन शारबिंद्रे यांनी संघटनेमध्ये सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम गेली चार वर्ष करत आहेत. आणि या कामाची पोचपावती म्हणून सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष कोठारी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, राज्यनिरीक्षक घनःश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी यांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी सोहन शारबिंद्रे यांची नियुक्ती जाहीर केली.
सोहन शारबिंद्रे शिरोडा व आरोंदा येथे व्हिजन आय प्लस ऑप्टिकल्सच्या माध्यमातून कार्यरत आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य तसेच रोटरी क्लब शिरोडा सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.