गणेशोत्सव काळात अवजड वाहन वाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी

39

 

देवगड (प्रतिनिधी)

गणेशोत्सव काळात अवजड वाहन वाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुंबईसह इतर ठिकाणांहून चाकरमान्यांची गावाकडे परतीची गर्दी होत असते. यावेळी अवजड वाहने (१०० ते १२५ ट्रक-टेम्पो) रोज देवगड तालुक्यातून जात असतात. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहन वाहतुकीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख विलास मधुकर साळसकर यांनी तहसीलदार व दंडाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

गणेशोत्सवात मुंबईसह इतर ठिकाणांहून चाकरमान्यांच्या मोठ्या प्रमाणावर आगमनामुळे स्थानिक रस्त्यांवर प्रचंड वाहतूक वाढते. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे होणारी अडचण लक्षात घेता शासनाने या कालावधीत वाहतूक बंदीचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.