देवगड (प्रतिनिधी)
शिवसेना देवगड तालुकाप्रमुखपदी अमोल लोके यांची फेरनियुक्ती
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्यनेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना देवगड तालुकाप्रमुख पदावर अमोल विजय लोके यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
अमोल लोके यांची फेरनिवड झाल्यामुळे देवगड तालुक्यात युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवकांची बांधणी चांगल्या पद्धतीने करण्याचा त्यांचा प्रामुख्याने उद्देश असून, त्या दृष्टीने ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे तालुक्यात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.





