कणकवली : शहरातील बांधकरवाडी येथील शाळा नं २ परिसरात बुधवारी दुपारी १२:१५ वा. च्या सुमारास किरकोळ कचरा जाळण्यासाठी आग लावण्यात आली होती. मात्र दुपारच्या सुमारास आग लावल्याने आग नजीकच्या गवताला लागून भडका उडाला.
आगीच्या भडक्यात तेथील झाडे जळाली. या बाबतची माहिती शाळा नं २ च्या शिक्षकांनी नगरसेवक अभि मुसळे यांना दिली. मुसळे यांनी तात्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी मागवला. अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या आग लागलेल्या भागाच्या आसपास शाळा व वस्ती असल्याने होणारे संभाव्य नुकसान देखील टळले. नगरपंचायत कर्मचारी रोहन डीचोलकर व इतर न. पं. कर्मचाऱ्यानी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.





