देवगड भाजप मंडलाच्या वतीने जामसंडे शहरात तिरंगा रॅली

11

 

देवगड (प्रतिनिधी)

देवगड भाजप मंडलाच्या वतीने जामसंडे शहरात तिरंगा रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जामसंडे शहरात भाजपा देवगड मंडलच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी ही तिरंगा रॅली भाजपाच्या वतीने आज आयोजित करण्यात आली होती.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नेते बाळ खडपे, जिल्हा सरचिटणीस संदिप साटम,जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळस्कर, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ,तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर,महेश जंगले,उपाध्यक्ष गोविंद सावंत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दया पाटील, राजेंद्र शेटये,राजेंद वालकर,वैभव करंगुटकर, सुभाष धुरी,गटनेते नगरसेवक शरद ठुकरुल, संतोष तारी, आद्या गुमास्ते,मनिषा जामसंडेकर, तन्वी चांदोस्कर,चंद्रकांत कावले, व्हि.सी.खडपकर, रविंद्र चिंदरकर,मृणालीनी भडसाळे, वैशाली तोडणकर, प्रकाश गोगटे तसेच विद्यार्थी, शहरातील नागरिक, व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.