देवगड (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांसाठी “हेल्पलाईन नंबर”चे अनावरण : युथ फोरम देवगडचा उपक्रम
युथ फोरम देवगडच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात आज “विद्यार्थी हेल्पलाईन नंबर”चे अनावरण करण्यात आले. युथ फोरम देवगड, देवगड-जामसंडे शहर कमिटी आणि देवगड महाविद्यालय कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
स. ह. केळकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर, देवगड-जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक श्री. संतोष तरी यांच्या हस्ते हेल्पलाईन फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी युथ फोरम देवगडचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगांवकर यांनी विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.
या प्रसंगी युथ फोरम देवगडचे खजिनदार सागर गावकर, शहर कमिटी अध्यक्ष ओंकार सारंग, उपाध्यक्ष जितेश मोहिते, सहसचिव दीप नलावडे, शुभम महाजन, राधा जगताप, श्रवण बांदेकर, रुद्रा शेट्टे, श्रेयस कडू, हर्षित कोयंडे, माजी अध्यक्ष सोहम पारकर, तसेच महाविद्यालय कमिटीचे अध्यक्ष दीपक जानकर, उपाध्यक्ष पूर्वा चौघुले, देवांत गावकर, सचिव सलोनी कदम, सहसचिव स्नेहा भस्मे, तनिष नाईक, वेदिका धुवली, पार्थ नाईकधुरे, आचाल वर्मा, स्वराज आचरेकर, भूपेश हरम, महेश्वरी कोयंडे, वैभवी घरकर, पियूष केतकर, ओम गांवकर यांच्यासह अनेक विद्यार्थी व युथ फोरमचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.






