सावंतवाडी (प्रतिनिधी)
कोकण विभागीय आयुक्तांची खोपोली ग्रामपंचायतीला भेट ; ग्रामपंचायतच्या लोकाभिमुख कामाचे केले कौतुक
कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी वाफोली ग्रामपंचायत ला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी वाफोली ग्रामपंचायती मार्फत देण्यात येणार्या सर्व प्रकारच्या ऑनलाईन दाखले व इतर सेवा अंतर्गत दाखले वितरण तसेच जलजिवन मिशन नळ योजना, प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुला च्या चाव्या वितरण ,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर व फळबाग व बांबू लागवड स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 वाफोली टेंबवाडी अंगणवाडी इत्यादी कामांच्या ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासोबत कोंकण विभाग अपर आयुक्त डॉ श्री माणिक दिवे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी श्री जगदीश खेबुडकर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जयप्रकाश परब ,उपविभागीय अधिकारी श्री हेमंत निकम, तहसीलदार श्री श्रीधर पाटिल, गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक,विस्तार अधिकारी श्री अंकुश जंगले, वाफोली सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री विनेश गवस,ग्राम पंचायत अधिकारी श्री प्रसाद ठाकूर ,सदस्य सौ मंजुळा शेगडे ,सौ साक्षी शिरोडकर, केंद्रचालक सौ. दया गावकर देसाई इत्यादी उपस्थित होते.निसर्ग रम्य वाफोली गावातील विविध विकासकामांचा दर्जा पाहून मा.विभागीय आयुक्त यानी ग्रामपंचायत वाफोली पंचायत समिती सावंतवाडीच्या सर्व टीम चे कौतुक केले.





