स्कूटी घसरून घडलेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या मोंड येथील राजेंद्र तांबे यांचे  जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन 

56

 

देवगड / प्रतिनिधी

 

स्कूटी घसरून घडलेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या मोंड येथील राजेंद्र तांबे यांचे  जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन 

 

स्कूटी घसरून घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले मोंड गावठणवाडी येथील राजेंद्र सदाशिव तांबे (वय ५२) यांचे ३ ऑगस्ट रोजी रात्री २.१५ वा. च्या सुमारास ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेची फिर्याद रजनी राजेंद्र तांबे (वय ४०, मोंड गावठणवाडी) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.

 

देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोंड गावठणवाडी येथील राजेंद्र तांबे हे २३ जुलै रोजी रात्री १०.४५ वा. च्या सुमारास स्कूटीने प्रवास करीत असताना मोंड राणेवाडी येथील रस्त्यावर त्यांची स्कूटी घसरून अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
मोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना २४ जुलै रोजी रात्री ३.३० वा. च्या सुमारास कोल्हापूर येथील विन्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना अन्य ठिकाणी उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना ३ ऑगस्ट रोजी रात्री दीड वा. ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रात्री २.१५ वा. च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.