खारेपाटण-शेर्पे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न !

9

 

 

कणकवली ( प्रतिनिधी)

खारेपाटण-शेर्पे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न !

 बुधवार, ३० जुलै २०२५ रोजी खारेपाटण आणि शेर्पे या दोन्ही केंद्रांची दुसरी संयुक्त शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या परिषदेला उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, केंद्र मुख्याध्यापक दशरथ शिंगारे, श्रीपाद बागडी, सखाराम खरात, अनिता पाटकर यांच्यासह दोन्ही केंद्रांतील सर्व शिक्षक उपस्थित होते. केंद्र शाळा शेर्पेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन आणि स्वागत पद्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन झाले.
या शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांना विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने संपन्न झाली. सुवर्णा बुरंगे यांनी इयत्ता दुसरीच्या मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती आणि घटक आधारित मासिक नियोजनावर सखोल मार्गदर्शन केले, तर शारदा गर्जे यांनी परख सर्वेक्षणाची सांख्यिकीय माहिती, विश्लेषण आणि उपाययोजना यावर प्रकाश टाकला. तसेच, सुप्रिया झगडे यांनी SQAAF आढावा आणि PAT चाचणी तयारीबद्दल उपयुक्त मार्गदर्शन केले.
या परिषदेचे सूत्रसंचालन तुषार तांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नाजनीन मुल्ला यांनी केले. या परिषदेमुळे शिक्षकांना अद्ययावत माहिती मिळाली असून, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हे मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.