ग्रामीण महिलांचा आत्मनिर्भरतेकडे विश्वासार्ह वाटचाल – कुणकेश्वरच्या महिलांकडून ‘काजू मोदक’ उत्पादनास सुरूवात

332

 

कुणकेश्वर (स्वप्नील लोके)

ग्रामीण महिलांचा आत्मनिर्भरतेकडे विश्वासार्ह वाटचाल – कुणकेश्वरच्या महिलांकडून ‘काजू मोदक’ उत्पादनास सुरूवात

कुणकेश्वर ग्रामपंचायत मार्फत दिलेल्या प्रशिक्षणातून प्रेरणा घेत, कुणकेश्वर गावातील महिला बचतगटांनी एक अभिनव आणि स्वादिष्ट उपक्रम हाती घेतला आहे. ‘शिवरत्न फूड प्रॉडक्ट’ या नावाने या महिलांनी स्थानिक स्तरावर काजू मोदक बनवण्याचा छोटासा उद्योग सुरू केला असून, तो सध्या खवय्यांच्या पसंतीस उतरतो आहे.
या महिलांनी वापरलेला प्रत्येक काजू हा स्थानिक पातळीवर मिळवलेला असून कोणतीही भेसळ न करता स्वच्छतेची काळजी घेऊन हे मोदक तयार केले जात आहेत. त्यामुळे या उत्पादनात गुणवत्ता, चव आणि पारंपरिकतेचा सुरेख संगम पाहायला मिळतो.
काजू उत्पादन हे कोकणातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असताना, त्याचा वापर करून महिलांनी मोदकसारख्या पारंपरिक गोड पदार्थाचे उत्पादन सुरू केल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहेच, शिवाय महिलांच्या स्वयंपूर्णतेचा मार्गही मोकळा झाला आहे. ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला हे उत्पादन एक उत्कृष्ट उदाहरण ठरते आहे.
या उपक्रमाची काही वैशिष्ट्ये:स्थानिक काजू वापरून तयार केलेले स्वादिष्ट काजू मोदक,कोणतीही भेसळ नसलेले शुद्ध आणि दर्जेदार उत्पादन,ग्रामीण महिलांच्या हस्तकलेचा आणि कौशल्याचा उत्कृष्ट नमुना,वैयक्तिक तसेच घाऊक ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत.
               ग्राहकांसाठी आवाहन:
आपण सर्वांनी ‘शिवरत्न फूड प्रॉडक्ट’च्या या चविष्ट व शुद्ध काजू मोदकांना प्रोत्साहन द्यावे, स्थानिक महिलांच्या कष्टाला साथ द्यावी आणि स्वदेशी उत्पादनांना पाठिंबा द्यावा . अशी अपेक्षा यावेळी कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर  व माजी सरपंच गोविंद घाडी, ग्रामसेवक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केली आहे .