हिंदळे येथे ३ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

61

 

देवगड (प्रतिनिधी) 

हिंदळे येथे ३ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

“चला रक्तदान करूया, अनेकांचे प्राण वाचवूया” या प्रेरणादायी उद्देशाने हिंदळे ग्रामपंचायत, हिंदळे ग्रामस्थ आणि सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठान, शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हे शिबिर विद्यामंदिर सभागृह, हिंदळे भंडारवाडा येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडणार आहे. गावातील युवक, ग्रामस्थ, संस्था व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

 

रक्तदान ही श्रेष्ठ सेवा मानली जाते. अपघात, शस्त्रक्रिया, गंभीर आजार अशा विविध कारणांनी रक्ताची आवश्यकता भासते. त्यामुळे हे शिबिर हे समाजासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान ठरणार आहे.

 

सर्व रक्तदात्यांनी पुढे येऊन या समाजोपयोगी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे.असे आवाहन आयोजकांच्या वतीने सरपंच मकरंद शिंदे यांनी केले आहे.