सावंतवाडी (प्रतिनिधी)
इन्सुली पोलीस चेकपोस्ट वर सहा लाख 80 हजाराचा दारूसह मुद्देमाल जप्त, एक ताब्यात बांदा पोलिसांची कारवाई
गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी इन्सुली चेकपोस्टवर मोठी कारवाई केली. या कारवाईत १ लाख ८० हजार रुपयांच्या दारूसह एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणे मुन्ना जानी शेख (वय ५०, रा. आंध्र प्रदेश) व शरणकुमार व्यंकटराव कोम्मालपाटी (वय २५ रा. तेलंगणा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.





