कणकवली (प्रतिनिधी)
युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२५ जाहीर ; २७ जुलै रोजी पालकमंत्री श्री .नितेश राणे यांच्या हस्ते होणार कणकवली वितरण
युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. युवा संदेश प्रतिष्ठानच्या तज्ञ कमिटी मार्फत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता शालेय विद्यार्थी, पालक, शालेय परिसरातील ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सन 2025 यावर्षांसाठी निवड जाहीर करण्यात येत आहे.
जिल्हा परीषद विभाग श्री. बापूशेट प्रभाकर कोरगावकर ,जि प शाळा तळवणे नं 1, ता. सावंतवाडी तर हायस्कूल विभाग दिव्या दिवाकर बाणे, एस् एम् हायस्कूल, ता .कणकवली यांची निवड करण्यात आली आहे.
सदर शिक्षकांना रविवार 27 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 10:30 वा भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे होणार्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा(STS)बक्षिस वितरण कार्यक्रमात मा श्री नितेश राणे , पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यावेळी मा श्री रविंद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग व मा श्री गणपती कमळकर, सिंधुदुर्ग शिक्षाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे 8 वे वर्ष असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कारमूर्तींचे सौ संजना संदेश सावंत माजी जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग आणि मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत संस्थापक अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





