युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न STS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा २७ रोजी होणार पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार
विमानाने ईस्त्रो सफर व लाखो रुपयांची रोख बक्षिसे असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार सोहळा *रविवार दिनांक २७ जुलै २०२५* रोजी सकाळी ठीक १०:३० वा भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अडीज लाखाची रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देऊन मा श्री नितेशजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात येणार आहे.
STS-2025 मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील इयत्ता ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो सहलीला नेण्यात आले तसेच २ री व ३ री मधील १० गुणवंत विद्यार्थ्यांना गोवा येथील सायन्स सेंटर ची भेट घडविण्यात आली आहे.
इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील २५० विद्यार्थ्यांना रोख अडीज लाखाची रोख बक्षिसे, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. इतर मेडल धारकांची मेडल्स केंद्र संचालक यांच्या मार्फत शाळांवर पाठविण्यात येणार आहे.
यावर्षी *सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2026 चे रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी आयोजन करण्यात आले असून फॉर्म वितरण सुरु झाले आहे.*युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचे हे 9 वे वर्ष असून *सिधुदुर्ग जिल्ह्यात 30 परीक्षा केंद्रावर* ही परीक्षा होणार आहे.
इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी आणि ७ वी साठी ही परीक्षा मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून होणार आहे.या परीक्षेचे *मुख्य परीक्षा केंद्रे – विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली* असून इतर परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे
@ फोंडा हायस्कूल @ जी प शाळा खारेपाटण न १ @ वामनराव महाडिक विद्यालय,तरेळे @ कनेडी हाय स्कूल, सांगवे @ शिरगाव हायस्कूल @ शाळा जामसंडे न १,देवगड @ शाळा कुणकेश्वर न १, देवगड @ पडेल हायस्कूल, पडेल @ रामगड हायस्कूल @ आचरा हायस्कूल @ टोपीवाला हायस्कूल,मालवण @ वराडकर हायस्कूल कट्टा @ कुडाळ हायस्कूल,कुडाळ @ न्यू इंग्लिश स्कूल कसाल @ मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव @ कळसुलकर हायस्कूल ,सावंतवाडी @ सैनिक स्कूल,आंबोली @ शाळा माडखोल न १ @ शाळा मळेवाड न १ @ खेमराज मेमोरियल हायस्कूल,बांदा @ कलंबिस्त हायस्कूल, कलंबिस्त @ न्यू इंग्लिश स्कूल दोडामार्ग @ न्यू इंग्लिश स्कूल भेडशी @ वेंगुर्ला हायस्कूल @अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी
उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच . त्याच प्रमाणे *निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.* यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी , कोल्हापुर,पालघर व ठाणे जिल्हात आयोजित करण्यात आली आहे.
तरी सर्वांनी सहभागी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा मा सौ संजना संदेश सावंत(माजी जी प अध्यक्ष) यांनी केले असून अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख श्री. सुशांत सुभाष मर्गज (९४२०२०६३२६), प्रमोद पवार ९४२१२६६७५१ यांच्याशी संपर्क साधावा.