मोती तलावाचं पाणी दुषित..? | मासे मरण्याच सत्र सुरूच

सावंतवाडी : गेले कित्येक दिवसापासून सावंतवाडी मोती तलावामध्ये मध्ये मासे मरण्याचे सत्र सुरू झालेले आहे. मोती तलावामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याकरिता सामाजिक बांधिलकीने नगरपरिषदेचे लक्ष वेधले होते. परंतु, नगरपरिषदे मार्फत या विषया संदर्भात अजूनही ठोस पावले उचलली गेली नाहीत. परिणामी मासे मरण्याचं सत्र सुरू झाल आहे. तरी या विषयाकडे नगर परिषदेने गांभीर्याने लक्ष देऊन पाणी शुद्धीकरणाबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी  विनंती सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.