सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी ! ; अन्यथा विमा कंपन्यांवर करवाई – मंत्री ना. नितेश राणे
विमा कंपनी शेतकऱ्यांवर उपकार करीत नाही, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळाली नाही तर या विमा कंपन्यांवर कारवाई होईल मात्र त्या विमा कंपन्या शासनाकडून बदलून घेऊ, अशी तंबी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात ४२,२८१ शेतकरी पीकविमा धारक आहेत. हवामानाची आकडेवारी मिळवणं ही जबाबदारी विमा कंपनीची आहे. यामध्ये कारणे नको. नुकसान भरपाई तातडीने द्या, असे निर्देश पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी दिले.
जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाई तातडीने मिळण्याबाबत पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती नाईकनवरे, कृषी विद्यापीठ अधिकारी, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, अशोक सावंत जिल्हा बँक सी ई ओ प्रमोद गावडे. आदी उपस्थित होते.
पिक विम्यात सुपारी पिकाचा समावेश नाही. त्याचाही समावेश व्हावा, अशी मागणी मनीष दळवी यांनी केली. हा निर्णय सरकार घेईल. त्याबाबत कृषी मंत्र्यांकडे बैठक घेऊ, असे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी स्पष्ट केले.





