व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलच्या विद्यार्थ्यांची गोव्यातील पुनिस्का इंजेक्टेबल्स फार्मा कंपनीत निवड
व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल मार्फत चालू शैक्षणिक वर्ष २०२५ मध्ये डी फार्मसी, बी फार्मसी आणि एम फार्मसी विद्यार्थांसाठी माहे जून २०२५ अखेर पर्यंत तीन प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आले. १२ जुलै २०२५ रोजी महाविद्यालयाने चौथा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये गोव्यातील पुनिस्का इंजेक्टेबल्स फार्मा मार्फत प्रोडक्शन आणि क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट साठी एकूण २५ विद्यार्थांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये पाच विद्यार्थ्यांची प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि पाच विद्यार्थ्यांची क्वालिटी क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट अशी एकूण दहा विद्यार्थांची निवड करण्यात आली.
विद्यापीठ परीक्षेच्या अंतिम निकालापूर्वीच महाविद्यालयार्फत आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राईव्ह मार्फत महाविद्यालयातील पन्नास हून अधिक विद्यार्थांची विविध नामांकित फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये निवड झाल्याबद्दल संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ राहुल पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल चे प्रमुख डॉ संदेश सोमनाचे आणि सहकारी यांचे कौतुक केले. विद्यार्थांच्या या निवडी बद्दल विद्यार्थी आणि पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
विद्यापीठ आणि मान्यता परिषदेच्या नियमित अभ्यासक्रमाबरोबरच महाविद्यालयात औद्योगिक आणि व्यावसाय पूरक अभ्यासक्रम घेतले जातात. यामुळे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज साठी प्रशिक्षित आणि कार्यकुशल उमेदवार उपलब्ध होत आहेत. महाविद्यालयार्फत येणाऱ्या नजिकच्या काळात देखील विद्यार्थांच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट साठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे यांनी सांगितले.