कारिवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांचा रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीमार्फत भव्य सत्कार

15

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

कारिवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांचा रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीमार्फत भव्य सत्कार

ऑपरेशन सिंधूर,ऑपरेशन पराक्रम, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक अशा विविध शौर्यगाथांचे साक्षीदार असलेले भारतीय सैन्यदलातील डिफेन्स युनिटचे प्रमुखजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांचा रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीमार्फत भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी सुभेदार मेजर संजय सावंत यांनी सैन्यदलातील गेल्या 33 वर्षातील यशस्वी प्रवास वर्णन करताना कारगिल युद्ध, बालाकोट एअर स्ट्राईक, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन सिंधूर ची शौर्य गाथा वर्णन केले.
यावेळी सर्वांच्याच अंगावर शहारे आले. राष्ट्रभक्ती हिच सर्वोच्च आहे जीवनात याचा प्रत्यय सुभेदार मेजर संजय सावंत यांचे व्यक्तिमत्त्वातून आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष रो ॲड सिध्दार्थ भांबुरे, सचिव रो सिताराम तेली, खजिनदार रो आनंद रासम, रो सचिन मदाने आदि उपस्थित होते.