कणकवली (प्रतिनिधी)
शिवरायांनी बांधलेल्या महाराष्ट्रातील ११ किल्ले युनोस्कोच्या जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल आपल्या सर्वांना गर्व आहे – डॉ कैलासभाऊ कदम
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी बांधलेल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ले युनोस्कोच्या जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल आपल्या सर्वांना गर्व आहे – डॉ कैलासभाऊ कदम
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी बांधलेल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ले युनोस्कोच्या जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल आपल्या सर्वांना गर्व आहे. आपल्या जिल्ह्याला सिंधुदुर्ग जिल्हा हे जे नाव मिळाले ते छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादानेच. सिंधुदुर्ग किल्ल्यासह राजधानी रायगड अशा 12 किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळाल्यामुळे वैभवशाली कोकण पुन्हा स्वाभिमानाने प्रगतीची वाटचाल करेल.
सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने आज डांगे चौक, थेरगाव येथील ‘सिंधुदुर्ग भवन’ येथे फटाके वाजवून, पेढे वाटून, फुगड्या खेळत, ढोल ताशाच्या तालावर नाचत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष डॉ कैलासभाऊ कदम, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री अजय पाताडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष अनिकेत प्रभु, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी केले,तर आभार परशुराम (भाई) प्रभू यांनी मानले.
यावेळी अनेक कार्यकर्ते तसेच थेरगाव परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष श्री अरुण दळवी, कार्याध्यक्ष श्री विश्वास राणे, सहखजीनदार श्री चंद्रकांत साळसकर, पराग पालकर, प्रकाश परब, नंदकिशोर सावंत, महादेव बागवे, राजेश कांडर, बाळकृष्ण गुरव, अनिल सावंत, दिपक राणे, संतोष गावडे, नरेंद्र धुरी, संतोष साटम, अधिक जाणून मुळीक, हिराशेठ प्रजापती, विजय आयरे, विजय महाडीक, अनिल मैजारी, संजय सावंत, सौ. अक्षता पाताडे, सौ. सोनाली कांडर, सौ.श्रध्दा साटम, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





