कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर !

16

 

कुडाळ (प्रतिनिधी)

कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर !

        कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींची सन २०२५-३० या कालावधीसाठीची सरपंच पदाची आरक्षण सोडत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी जाहीर केली. ६८ पैकी ३४ ग्रामपंचायतीत महिला सरपंच विराजमान होणार आहेत. या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुक आनंदीत झाले तर काहींच्या मनासारखे आरक्षण न पडल्याने त्यांचा हिरमोड झाला .

 

         कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये मंगळवारी सरपंच आरक्षण सोडत चिठ्ठया पद्धतीने कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ पडतेवाडी शाळेमधील इयत्ता पहिली मधील ऋत्वी रुपेश धुरी व चैत्राली अविनाश वारंग या दोन मुलींच्या हस्ते काढण्यात आली .

 

यामध्ये अनु.जाती(महिला)-३,अनु.जाती सर्वसाधारण-२, अनुसूचित जमाती-१, नामाप्र-९, नामाप्र(महिला)-९, खुला प्रवर्ग -२२,खुला प्रवर्ग(महिला)-२२ असे ६८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे –
अनु. जाती (महिला) – बांबुळी, वाडीवरवडे व आंबडपाल. अनु.जाती सर्वसाधारण- रानबांबुळी व निरूखे. अनुसूचित जमाती प्रवर्ग-आंब्रड, नागरीकांचा मागास प्रवर्ग-घोटगे,वसोली,ओरोस बुदुक,हुमरमळा-वालावल, माड्याचीवाडी, गोठोस,पुळास,कसाल,केरवडे तर्फ माणगांव, नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)- -पावशी, मांडकुली, हुमरमळा-अणाव, पिंगुळी, निवजे, तुळसुली कर्याद नारुर, नानेली, माणगांव, गोवेरी.
खुला प्रवर्ग – भरणी,भडगाव बुद्रुक,नारुर कर्याद नारुर,गावराई,सरंबळ,तेर्सेबांबर्डे,कुपवडे,वेताळ बांबर्डे,बिबवणे,हिर्लोक,कालेली,केरवडे कर्याद नारुर,घावनळे,परबवाडा पाट,सोनवडे तर्फ कळसुली,वाडोस,नेरुर कर्याद नारुर,साळगांव, आवळेगांव – ओरोस खुर्द, डिगस, कवठी, सोनवडे तर्फे हवेली खुला प्रवर्ग- (महिला) तेंडोली, वालावल, आंदुर्ले, झाराप, चेंदवण, पणदूर,पोखरण-कुसबे, हुमरस, कुंदे, मुळदे, पांग्रड, तुळसुली तर्फ माणगांव, शिवापूर, पडवे, कडावल, आकेरी, बांव, वर्दे, गिरगांव- कुसगाव, अणाव, जांभवडे व नेरुर देऊळवाडा अशी आरक्षण सोडत काढण्यात आली.  यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरीक उपस्थित होते.
सुचना – हरकतींचे तहसीलदारांनी केले निरसन!
       कुडाळ तालुक्यात ६८ ग्रामपंचायती आहेत. आजच्या सरपंच सोडत मध्ये उपस्थित सर्व नागरिकांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं;त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत शांततेत पार पडली. यावेळी काही नागरिक पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या,हरकती मांडल्या; त्या सर्वाचे आम्ही याच ठिकाणी निरसन केले असल्याची माहिती कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिली.यावेळी निवासी नायाब तहसीलदार अमरसिंग जाधव,महसुल नायाब तहसीलदार संजय गवस, निवडणूक नायाब तहसीलदार प्रमोद पिळणकर आदींसह महसुली कर्मचारी उपस्थित होते.कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी यावेळी भेट दिली.