वैभववाडी (प्रतिनिधी)
वैभववाडी सरपंच आरक्षण सोडत; कोणाला लॉटरी पहा.
तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज पुन्हा आरक्षण जाहीर झाले. काही अंशी ग्रामपंचायतीच्या आरक्षणात बदल झाला. मंगळवारी तहसिलदार सुर्यकांत पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत झाली. यावेळी निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील, नायब तहसिलदार शिवाजी सुतार, नायब तहसीलदार सचिन निकम, कर्मचारी एम एस बाबर, कांचन मांजरेकर, बी टी मांजरेकर, एस एम नायगावकर, भाजपचे सुधीर नकाशे, नासीर काझी, संजय सावंत, विजय तावडे, प्रदीप नारकर, बाळा रावराणे, रितेश सुतार, नवलराज काळे, बाजीराव मोरे, अवधूत नारकर, उबाठाचे मंगेश लोके, नंदू शिंदे नलिनी पाटील यासह विविध गावचे सरपंच उपस्थित होते.





