कणकवली (प्रतिनिधी)
मोबाईल आणि इंटरनेटचा वापर विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी करावा – घनश्याम गांवकर
सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे आणि या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इंटरनेटचा वापर केवळ ज्ञानार्जनासाठी करावा .आपल्या करिअरची ध्येयनिश्चिती करून ते ध्येय गाठण्यासाठी अथक प्रयत्न करावे, असे मार्गदर्शन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई संस्थेचे राज्य अध्यक्ष घनश्याम गांवकर यांनी केले.क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज मुंबई, संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने रविवार समाजातील इयत्ता १० वी /१२वी आणि इतर शैक्षणिक क्षेत्रात / क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कणकवली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात घनश्याम गांवकर बोलत होते .
या गुणगौरव कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष घनःश्याम गांवकर. उपाध्यक्ष श्री. लक्ष्मण घाडीगांवकर, मध्यवर्ती कार्यकारणी सदस्य /पत्रकार विजय गांवकर ,जिल्हाध्यक्ष सूर्यकांत घाडी, प्रदीप घाडी, बुधाजी घाडीगांवकर, सुनील गांवकर , आडेलकरगुरुजी, कळसुलकर गुरुजी आदी मान्यवर सभा मंचावर उपस्थित होते.






