पालकमंत्री नितेश राणेंची भूमिका जिल्ह्याच्या विकासासाठी फलदायी –  प्रमोद कामत

12

 

बांदा (प्रतिनिधी)

पालकमंत्री नितेश राणेंची भूमिका जिल्ह्याच्या विकासासाठी फलदायी –  प्रमोद कामत

नागपूर पवनार या शक्तीपीठ महामार्गामुळे बांदा येथील बाजारपेठ, पर्यटन व जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता होती. हा शक्तिपीठ महामार्ग गोव्याकडे न जाता तो मळगाव किंवा झाराप येथे जोडण्यात यावा ही पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेली भूमिका जिल्ह्याच्या विकासासाठी फलदायी ठरणार असून त्यांच्या भूमिकचे आम्ही समर्थन करतो असे प्रतिपादन माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांनी आज रविवारी बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
अलीकडेच पालकमंत्री नितेश राणे यांनी शक्तिपीठ महामार्ग गोव्याकडे न जाता तो मळगाव किंवा झाराप येथे जोडण्यात यावा अशी भुमिका घेत प्रशासनाला तसा प्रस्ताव तयार करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. महामार्गाचा आता असलेला आराखडा त्यांनी बदलणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकचे आम्ही समर्थन करतो असे श्री. प्रमोद कामत म्हणाले. बांदा मंडल भारतीय जनता पार्टी, महामार्ग विरोधी शेतकरी कृती समिती व शेतकरी यांच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री कामत बोलत होते.
प्रमोद कामत पुढे म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग बांदा सीमेलगत बाहेर पडणार होता. याबाबत आम्ही बांदा ग्रामस्थ, पदाधिकारी व शेतकरी यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली होती. याबाबत पालकमंत्री नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांची हि भेट घेतली होती. बारा गावे बाधित होणार तसेच होणाऱ्या नुकसानिबाबत व्यथा मांडली होती. खासदार नारायण राणे यांनी त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्याच्या विकासाला या महामार्गाचा विकास होईल असे तिन आराखडे तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता तीन प्लॅन तयार असुन त्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी सदर महामार्ग झाराप किंवा मळगाव येथे जोडवा अशी भूमिका मांडत सदरचा जुना प्लॅन बदलणारच असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत असुन त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे श्री. कामत यांनी सांगितले.
यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी अध्यक्ष महेश धुरी, सरचिटणीस मधुकर देसाई, जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब,उमेश पेडणेकर, नेतार्डे उपसरपंच प्रशांत कामत, राजेश विरनोडकर, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, माजी उपसरपंच बाळू सावंत, ज्ञानेश्वर सावंत, उमेश पेडणेकर, उपसरपंच आबा धारगळकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, नितीन राऊळ, इन्सुली सोसायटीचे चेअरमन दादा परब,माजी सरपंच दीपक सावंत, गुरु सावंत, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, साई पावसकर, संदीप बांदेकर, गुरु कल्याणकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, राजा सावंत, दूध सोसायटी अध्यक्ष गजानन गायतोंडे, संदीप बांदेकर, शांताराम बंदिवाडेकर, नितीन सावंत, राजा सावंत, भाऊ वाळके, मयुर परब, निलेश कदम आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.