देवगड मधील सुर्यकांत मेस्त्री यांचे मरणोत्तर देहदान !

28

 

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)

देवगड मधील सुर्यकांत मेस्त्री यांचे मरणोत्तर देहदान !

जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे १२३ वे मरणोत्तर देहदान!
पडवे: मेडिकल कॉलेज येथे सुर्यकांत मेस्त्री यांचे मरणोत्तर देहदान करताना कुटुंबिय व स्वरूप संप्रदायाचे भक्तगण.
देवगड येथील सुर्यकांत शामराव मेस्त्री (वय ७९) यांचे २२ जून २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने झालेले हे १२३ वे देहदान आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ३ रे मरणोत्तर देहदान आहे, अशी माहीती जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान कडून देण्यात आली.
कै. सुर्यकांत मेस्त्री यांचे मरणोत्तर देहदान एस. एस.पी.एम. मेडिकल कॉलेज, पडवे-सिंधुदुर्ग येथे जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजधाम तर्फे करण्यात आले आहे.
यावेळी त्यांचे नातेवाईक पत्नी सुलोचना मेस्त्री, मुलगा आशिष मेस्त्री, सुन अक्षता आशिष मेस्त्री, मुलगी संपदा संजय गुरव, जावई संजय गणपत गुरव, भाऊ रविंद्र शामराव मेस्त्री, वाहिनी स्नेहा शशिकांत मेस्त्री, भाऊ शशिकांत शामराव मेस्त्री, बहीण मनिषा मोहन पांचाळ, नातु सागर, हर्षद, पुतणे प्रशांत, दिलिप, सुयोग, संतोष, भाची राजश्री राधाकृष्ण मेस्त्री, स्वरूप संप्रदायातर्फे मुख्यपीठ सहपीठ प्रमुख दिपक खरुडे, मुख्यपीठ लेप्टनंट जनरल राजेंद्र खांबल, सिंधुदुर्ग जिल्हा सचिव परमानंद करंगुटकर, प्रवचनकार विलास परब व अभिषेक राऊळ, निलेश बोंद्रे, नारायण तांबे, महेश राणे, भरत परब व इतर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळीही मेस्त्री कुटुंबियांकडे देहदानाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहीती जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान सिंधुदुर्ग कडून प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली.