देवगड (प्रतिनिधी)
वरेरी बौद्धवाडी येथील ३५ वर्षीय विवाहिता बेपत्ता
देवगड तालुक्यातील वरेरी बौद्धवाडी येथील सपना संदीप जाधव (३५) ही विवाहिता ३१ में रोजी बेपत्ता असल्याची तक्रार तिचे पती संदीप प्रकाश जाधव(३७) यांनी देवगड पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरेरी बौद्धवाडी येथील सपना संदीप जाधव वय ३५ ही विवाहिता ३१ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता घरातुन कोणालाही न सांगता निघून गेली .तिला वारंवार घरातून निघून जाण्याची सवय देखील आहे.मात्र ३१ मे रोजी ती घरातून कोणाला न सांगता निघून गेली. ती परत आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती कोठेच मिळाली नसल्याने तिचे पती संदीप यांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबतच्या अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव करत आहेत.





